मी एक ठाणेकर आहे. सध्यातरी ठाणेच आमचे गाव, ठाणेच आमचे माहेरघर.

मी ठाणेकर बोलते , ठाणे आमचे सुंदर शहर मुंबईपासून ३५ किलोमीटर वर त्याचे अंतर.

ठाणे माझी जन्मभुमी , माझी मायभूमी तिला माझा नमस्कार असो. माझ बालपण ठाण्यामध्येच गेल. शिक्षणही ठाण्यातच झाल. आणि नोकरीसुद्धा ठाण्यातच केली. ..........पण 

बाबांचा जन्म कोकणात. बाबा ४ थी ला असताना त्यांचे  वडील वारले,  शिक्षणही कोकणातच , परंतू पाठीशी वडील नाहीत , मागे आई , भाऊ , बहीण यांचा विचार करत असतानाच बाबांना गावाकडे नोकरी नाही म्हणून आले मुंबईतच , ठाण्यातच राहिले , ठाण्याचे रहिवासी झाले. नोकरीही मिळाली ठाण्यातच. ह्याच ठाणे शहराने आम्हांला निवारा दिला. माझी आजी एकटीच गावाला रहायची आम्ही मात्र प्रत्येक वर्षी गावी जायचो, त्या एप्रिल, मे महिन्याची, गणपतीची, होळी शिमग्याची गावी जाण्यासाठी वाट बघत राहायचो. जेव्हा आम्हांला गावाला जायची वेळ यायची तेव्हा मात्र , माझी आजी एकटीच असायची. बरीच वस्तूंची मागणी नाही पण बाबा तुका काही जमला तर, घेऊन ये हा ? असं सांगायची. शिमगा ईलो की बोलायची बाबा काहीतरी घेऊन ये गणपती इले की बोलायचे की मुंबईसून फुटाणे आणि वाइच फरसाण घेऊन ये. कोणी इला तर हातावर देऊक बरा वाटता. दिवाळी आली की बोलायची मी हयच बरी असा, माका नको ती मुंबई. तुम्ही आपले सुखी रव्हा, चेडु जास्त बाहेर फिरा नको हां !  शाळेत जा, अभ्यास कर, मोठी हो. आम्ही मुंबईला यायला निघालो की आम्हांला कुडाळ बस स्टँड वर सोडायला यायची. नेहमीप्रमाणे तिच्या डोळ्यात अश्रू असायचे आणि आमच्याही, आणि आम्ही मात्र पून्हा कधी गावी जाणार याची वाट बघत राहायचो. आयेला पण आम्ही अधूनमधून मुंबईला आणायचो. आजी मुंबईला आली. आजी आमच्यासोबत राहिली. २०१४ हया वर्षी काळाने घात केला. त्या वर्षानंतर आमच गावी जाणं कमी झाल कारण गावी कोणीच नाही नेहमीप्रमाणे कोकणात जाण्याची ती ओढ मनं अजूनही धाव घेत. आज आजी जरी नसली तरी तिच्या गोड आठवणी अजूनही येतात. तिने आमच्यासाठी कोकणात एक सुंदर आठवण ठेऊन गेली ते म्हणजे आमच्या कोकणातल सिंधुदुर्ग जिल्हा, कुडाळ तालुका, तूळसुली मध्ये घनदाट आमराई, नारळाच्या बागामधलं आमचं कोकणातल घरं. अश्या ह्या आजीला माझा नमस्कार असो. 🙏 🙏  पण ............गावांत असणारे शेजारी नातेवाईक ह्यांनाच नाही तर, मला हा देश lockdown झाला तेव्हाही नाही परंतू जेंव्हा अखेर जीवाची, जीवनाची, जगण्याची वेळ आली तेव्हां कुठे गेलं ते कोकणातल्या माणसाचं काळीज, कुठे गेला तो जिव्हाळा, कुठे गेली ती माणुसकी असे अनेक प्रश्न ? ? ? ? ? ? ? भेडसावत गेले? पण मला ही एक प्रश्न समस्त ठाणेकर मुंबईकरांसाठी आज पडला आहे,  जर हे कोरोना संकट आलेले आहे तर आपल्या कोकणवासि आणि कोंकण सुरक्षित आहे हे बघून आनंद वाटला पाहीजे नाही का ? वाईट एवढच वाटत की, आज ह्या कोरोना विषाणू मुळे आज ठाणेकर आणि मुंबईकरांची ताटातूट झाली. कोंकण आणि मुंबई मध्ये अंतर पडले. पण हे वादळ काही जास्त दिवस राहाणार नाही. कोंकण भूमी आणि आपली कोकणातील माणसं पण आपलीच आहेत. आज कोरोना विषाणू मुळे आपल्याच लोकांना आपल्याला सांभाळायच आहे वाचवायचे आहे तर,  काही नियम हे आलेच पाहिजेत. आणि म्हणून                      १४ दिवसाचा Quarantine आज मुंबईतल्या ठाणेकराला २८ दिवसांचा केला हे नियम लावणे गरजेचे झाले. आपल्याला अभिमान हवा की आपल्या सिंधुदुर्गजिल्यानी हया कोरोनाचा पराभव केला. त्याला आपल्या कोंकणच्या वेशीवर येऊकच दिला नाही. कारण आपल्या कोंकणी माणसाक भूता घाबरतत तर हया कोरोनाची काय हिंमत ? ता कोकणात येतलो !  कोरोना हा निसर्गरम्य घनदाट वनराई मध्ये येऊ शकत नाही. आणि कोकणाची सुंदरता ही शुध्द हवा, नद्या आणि समुद्रामध्ये आहे. निसर्गाची सुंदर देणं हे कोंकण स्वर्गाहुनही सुंदर. हिरवीगार झाडी, डोंगर, दरी, नद्या , समुद्र , निसर्गरम्य वातावरण आणि त्यामध्ये असणारी शुद्ध हवा आज शहरी भागात नाही. आणि बघा तर, अतिशय प्रसिद्ध असणारे शहर अमेरिका, मनाला काम सोडून games, pabji, chinise अजून काही aaps इतर विषयात गुंतवणारी चीन व इतर अनेक देश आणि जगविख्यात असणारी ही मुंबई तिला लागूनच ठाणे त्यालाच काही १५० अंतरावर असणारे पुणे बघा बर आज हीच शहर रेड झोन मध्ये आहेत. सर्वात जास्त रूग्ण ह्याच भागातून येत आहेत. जणू काही साखळीच निर्माण झाली. (मुंबई - ठाणे - पूणे ) त्रिमूर्ति सारखी.

गावाच्या देवाची पूजा , पालखी  , देऊळ बांधायला देणगी देण्यासाठी आणि देणग्याची पुस्तकेपण भरायला ठाणेकर मुंबईकरच हवा नाही असायलाच हवा. मतदान जरी आल तरी ठाणेकराला बोलावून घेतात. आणि गावातला कोणताही कार्यक्रम करायला घेतला की, घरातले कोणीही एक वरिष्ठ गावी गेलेच पाहिजेत गावातल्या रितीभाती माहीत हव्यात म्हणून. ठाणेकर मुंबई चे चाकरमाण्यानी जायला हवेच आणि त्यांनी हक्काने गावी जायलाच पाहीजे. गावाच्या घरात जर कोणी सीर्यस झाल तर गावातले ताबडतोब बोलतात की , ह्याका तुमच्या सोबत घेऊन जा. बरोबर आहे शहरात उपचार होतील म्हणून,  गावाक हॉस्पिटल नाहीत  ........पण आज ठाणेकर मोठ्या संकटात सापडलेत. गावातलो एक माणूस बोलत नाही असं नाही आजही आपल्या गावावरून आपली चौकशी होते. शिवाय देवाक कौल लावले जातत गार्हाण गायले जातात की सगळ्यांका सुखात ठेव मुंबईक असणाऱ्या आमच्या पोराबाळाका, भावकीक ह्या कोरोनाच्या संकटातून सुखरूप बाहेर काढ ! होय महाराजा !   तसेच आपल्या सर्वांचा आवडता फळांचा राजा हापूस आंबा म्हणून ओळखला जातो. आज इतकी वर्ष अगदी आवडीने सर्वांनी खात आलेत. जगभरात आंब्याला भरघोस मागणी आहे. पण आता तोही थप्प झाला कोंकणात नाही. शहरात येण्यास कोरोना हया एका राक्षसाने थांबवला. म्हणून कोंकणवसियानी                     

कोंकणकाशीच्या कुणकेश्वरला हापुस आंब्यांची आरास.




कोरोना महामारीच्या कहराने हापुस आंब्याचे नुकसान होत आहे. तसेच आंबा बागायतदारांना याचा मोठा फटका बसला आहे. म्हणून कोरोनाचे संकट दुर करण्यासाठी श्री देव कुणकेश्वराची हापुस आंब्यात पुजा करण्यात आली व कोरोनाचे संकट लवकरात लवकर जाऊदेत असे साकडे घालण्यात आले.

॥जय कुणकेश्वर॥

कोणी कोणाचा राग न धरता कोणीच विचारपूससाठी फोन नाही केला असं न बोलता की चाकरमान्यानो तुम्ही गावाक येवा हया गाव तुमचाच असा पण कळला हीच तुमची माणुसकी इथे आम्ही लोकांना सांगतो आमचा गाव असा आमचा गाव तसा पण ह्या कोरोना मुळे खरी माणुसकी कळली.  ह्या कीत्या वोलाक व्हया. जर आपण संकटात आहोत तर आपणच आपला गाव सुरक्षित कसं ठेवणार. कोरोना विषाणू ला मारायच आहे पळवायच आहे तर प्रत्येकाने अंतर ठेवणे हिताचेच आहे. अश्याप्रसंगी जिथे आहात तिकडेच सुरक्षित रहाण्यातच शहाणपणा बोलता येईल. आपण सर्व एक आहोत. सर्वच आपल्या देशाचे, राज्याचे आपणच रक्षक आहोत. आपणंच अश्याप्रसंगी जर समज नाही दाखवली तर इवढ मुंबईत शिकून काय उपयोग. का आपल्या आपल्या माणसात फूट पाडायची. मनाने अंतर करायचे ? का ? 

त्यापेक्षा काही घडवता आलच तर सर्वच लोकांसाठी ते कसे वाचतील याचा विचार करू ? हेवे, दावे करण्यात काहीच अर्थ नाही. हाच प्रसंग उलट असता तर मुंबई मध्ये किंव्हा ठाण्यात गावाच्या मंडळीना घेतलच नसत. जसे आज आपल्याच देशातली काही मुल, मुली परदेशी आहेत त्यांना भारतात घेऊ नका असं जाहीर केल होत. अरे पण ती लेकर पण आपलीच आहेत म्हणून आलेच की नाहीत ? ह्यामुळे दुरावा मिटला. कारण हा जीव जगणं फार मोठं आहे. उदया जगलो तर काही तरी करू. पण ...........................जर उदया हया जगातच नाही राहिलो तर काय करणार ? हा वाद सोडा. ह्या असूराला कसा घालवायचा ह्याचा विचार करा. सर्वांनी सुखी रहा हीच सर्वांची इच्छा.  आपण ह्या गावांचा tent स्वरूपात बांधून काळजी घेतली तर ? त्यासाठी गावाकडच्या देऊळ, शेतामध्यल्या झोपड्या बनवू,  काहीच नाही तर आपल्या गुरांच्या गोठ्यात सोय करू आणि झालच तर आपल्या गावातल्या मोकळ्या ठिकाणी अतिदक्षता विभाग करू. हे ही दिवस जातील ' तो पण दिवस आपलाच असेल काही महिन्यांनी कोरोना विषाणू संपेलच. पुन्हा लोक मुंबईला येणार मुंबई हून गावाला पण जाणार. आणि हेच ठाणे, पूणे, मुंबई आणि कोंकण हेच सर्वांचं हक्काच शहर होणार. स्वप्नांच शहर होणार. हक्कांने क्षणभर विसावा मिळेल. हे शहर गावचं नाही तर संपुर्ण जग आपलच आहे. ह्या भाड्याच्या देहाच्या घरातच किती दिवस मुक्काम ? का उगाच आपण आपल आपलं बोलतोय ? आपलं काहीच नाही. सर्व इथेच म्हणून माझी सर्वांना कळकळीची विनंती आहे. की कोणीही थांबले नाहीत. सर्वच हया संकटाला झुज देत आहोत प्रार्थना करा घरात बसून, आज देव ही नाही देवाऱ्यात. स्वतः देव दरवाजे लाऊन बसलेत. अजून मी काय बोलू? आपण तर माणूस आहोत.  देशासाठी लढू , संघर्ष करू , घरातच राहू , सुरक्षित राहू .......पण माझ्या देशाला मी मरू देणार नाही. हे जगच हा माझा श्वास आहे. जग जगातील माणसं हेच माझा विश्वास आहे. ठाणे, पूणे, मुंबई च नाही तर हया विश्वातूनच कोरोना ला पळवून लावणार. आणि माझ्या भारताला मी,  ठाणेकर कोरोनामुक्त करणार.

     कारण मी एक ठाणेकर आहे.  जय हिंद जय महाराष्ट्र. 



see more
Get in Touch

IN

Shrividya Energy Vaastu

01 Suraj plaza near Himdhara Society, Shreenagar Wagale Estate, 400604 Thane Maharashtra

Hours : Mon - Sat 10:30AM - 06:30PM

Contact Us Now

+91******0666


******************.com
Category : Astrologer

Write to Us




Missing Planets In Life
Pranic Healing
Mobile Number Positivity
Positive Energy In Body
Name Energy
Vastu Energy
Partnership
Pitrudevta Support
Numerology
Astrologer
Vastu Expert
see more